सुशिक्षितांपेक्षा अडाणी बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:29 AM2021-05-22T04:29:31+5:302021-05-22T04:29:31+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ ही प्रशासनाने विशेष मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेदरम्यान सुशिक्षित लोकांपेक्षा ...
रत्नागिरी : जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ ही प्रशासनाने विशेष मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेदरम्यान सुशिक्षित लोकांपेक्षा अशिक्षित लोकच कोरोनाबाबत खबरदारी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील लोकांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे. मात्र शहरी भागातील लोकांकडून बेफिकिरी दाखविली जात आहे.
अनुदानाअभावी वेतन ठप्प
रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कोरोना काळात या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतनच दिले गेले नसल्याने आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.
यंत्रणा वेठीला
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता कोकणातील अनेक भागात सत्ताधारी पक्षाचे तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळी मोठ्या प्रमाणावर दौऱ्यावर येत आहेत. यामुळे सध्या कोरोना तसेच आपत्तीच्या नियोजनाच्या धावपळीत असलेल्या यंत्रणांवरच अधिक ताण येत आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
चिपळूण : दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे स्वरूप बदलले आहे. कोरोनाचे संक्रमण हवेत होण्याचा धोका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोरोनापासून सुरक्षितता मिळविण्यासाठी नागरिकांनी दुहेरी मास्क वापरावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसोशीने करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.