भडे प्रशालेत जॉय आॅफ गिव्हिंग
By Admin | Published: February 23, 2015 09:51 PM2015-02-23T21:51:00+5:302015-02-24T00:00:54+5:30
ग्रामस्थ, पालकांचा प्रतिसाद : रंगमंचाची केली उभारणी
लांजा : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, भडे नं. १मध्ये राबवण्यात आलेल्या जॉय आॅफ गिव्हिंग उपक्रमाला ग्रामस्थ, पालकवर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देण्यातून पुण्य मिळतं का? माहीत नाही, पण समाधान मला नक्कीच मिळतं. हेच समाधान मिळवून देण्याच्या हेतूने प्रेरित होऊनप्रशालेत राबवलेल्या या उपक्रमाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुप पालटले आहे.
या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या भाऊबीज भेट उपक्रमातून शालेय दर्शनी सजावट पूर्णत्त्वास गेली आहे. ग्रामस्थांच्या देणगीतून स्वतंत्र संगणक कक्ष तसेच तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत, भडे यांच्या सौजन्याने रंगमंच साकारला आहे. पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांची संकल्पना आणि शाळेचे आधारस्तंभ संगीतकुमार राऊत, सुधीर तेंडुलकर रवींद्र भडेकर, लक्ष्मण तांबे, हरिश्चंद्र तेंडुलकर, बबनकाका तेंडुलकर, राजेंद्र लिंगायत, सरपंच मयुरी आडविलकर, ग्रामस्थ, पालक यांच्या योगदानामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया संदीप पावसकर यांनी दिली.प्रभारी मुख्याध्यापक संदीप पावसकर, वाडेकर, राजकुमार कोष्टी, स्मिता शिंदे यांचे केंद्रीयप्रमुख मीरा कामत, विस्तार अधिकारी विजयकुमार बंडगर, सातपुते, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, लांजा पंचायत समितीच्या माजी उपसभापती लीला घडशी, उपसभापती आदेश आंबोळकर, सभापती दीपाली दळवी व सहकारी यांनी विशेष कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील शाळेसाठी देणगीदारांनी जो उत्साह दाखवला तो वाखाणण्यासारखा आहे. (प्रतिनिधी)