कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भैरवगड यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:37+5:302021-04-12T04:29:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरूख : सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात पाडव्याच्या आदल्या दिवशी होणारी, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात पाडव्याच्या आदल्या दिवशी होणारी, १२ एप्रिल रोजी होणारी पूर्वनियोजित वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करत असल्याची घोषणा भैरवगड सातगाव मंडळाने केली आहे.
या यात्रेला रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सातगाव मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर परंपरा खंडित होऊ नये म्हणून प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत भैरवनाथाची पूजा करण्यात येणार असल्याची माहिती भैरवनाथ सातगाव मंडळातर्फे देण्यात आली आहे. भैरवगड सातगाव मानकरी मंडळात रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी, रातांबी, गोवळ, पाते, मजुत्री तर सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज व गावडेवाडी या गावांचा समावेश आहे.