भांबेड आराेग्य केंद्राला मिळाले डाॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:15+5:302021-04-06T04:30:15+5:30
लांजा तालुक्यातील भांबेड प्राथमिक आराेग्य केंद्रात नियुक्त झालेल्या डाॅ. धनंजय महाडिक यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. लाेकमत न्यूज नेटवर्क ...
लांजा तालुक्यातील भांबेड प्राथमिक आराेग्य केंद्रात नियुक्त झालेल्या डाॅ. धनंजय महाडिक यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे असलेल्या भांबेड प्राथमिक
आरोग्य केंद्रासाठी कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर मिळावा या मनसेच्या
मागणीला यश आले आहे. याठिकाणी डॉ. धनंजय महाडिक यांची नियुक्ती झाल्यानंतर मनसेतर्फे त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्याच्या पूर्व
भागातील मुख्य केंद्र आहे. भांबेड, व्हेळ, आरगाव, वाघणगाव, हर्दखळे, वेरवली,
कोर्ले, गोविळ, पालू, प्रभानवल्ली, खोरनिनको या गावांसह अनेक रुग्ण
याठिकाणी नियमित उपचारासाठी येतात; परंतु डॉक्टर नसल्याने या सेवा ठप्प झाल्या होत्या.
परिसरातील रुग्णांना तालुका किंवा जिल्हा ठिकाणी उपचारासाठी जावे लागत होते. प्रसूतीसाठी
आलेल्या महिलांची तर माेठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. भांबेड येथे तालुक्यातील इतर प्राथमिक
आरोग्य केंद्रांपेक्षा सर्वाधिक रुग्णांची ओपीडी आहे. असे असताना या आरोग्य
केंद्राचा प्रभारी पदभार असलेले डॉक्टर या ठिकाणी फिरकत नसल्याने
रुग्णांची फार मोठी गैरसोय होत होती.
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने याठिकाणी नियमित एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध व्हावा, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली होती. मनसेच्या पाठपुराव्याने या
मागणीला यश आले असून, या ठिकाणी नियमित एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाले
आहेत. मनसेचे लांजा तालुका संपर्क सचिव किरण प्रभाकर रेवाळे, शाखा अध्यक्ष
अशोक गांधी, मनसेसैनिक अभिषेक रसाळ, संदीप कुळये यांनी नव्याने रुजू झालेले डाॅ. धनंजय महाडिक यांचे स्वागत केले.