भंडारी समाजाच्या अडचणी सोडविणार : शेखर निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:13+5:302021-04-06T04:30:13+5:30
जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२१ या स्पर्धेदरम्यान आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन केले. (छाया : मंदार गोयथळे) लोकमत ...
जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२१ या स्पर्धेदरम्यान आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन केले. (छाया : मंदार गोयथळे)
लोकमत न्यूज नेटवर्क
असगोली : गुहागरातील भंडारी समाजाच्या माडी व्यवसायासंदर्भात व जातीच्या दाखल्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी येत्या विधिमंडळात मांडणार असल्याचे आश्वासन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिले. ते गुहागर तालुका जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेदरम्यान बोलत होते.
आमदार निकम पुढे म्हणाले, येथे भंडारी समाज खूप मोठा वर्ग आहे. या समाजामध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. येथील मुलांच्या शिक्षणासाठी व नोकरदारांसाठी जातीच्या दाखल्यासंदर्भात प्रमुख काही अडचणी आहेत. त्या लवकरच दूर करण्यात येतील. माडी व्यवसाय सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र माडी व्यवसाय करताना काही शासकीय जाचक अटी आहेत. त्या लवकरच दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
आजच्या घडीला महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू आहेत. तसेच या सरकारचे कार्यही चांगल्या स्वरूपाचे आहे. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास देखील आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.