भाऊ काटदरे यांचे कार्य बारावीच्या अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:37+5:302021-04-13T04:29:37+5:30
अडरे : कासव, निसर्ग संवर्धनासाठी गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ सह्याद्री मित्र संस्थेच्या माध्यमातून काम करणारे विश्वास तथा भाऊ ...
अडरे : कासव, निसर्ग संवर्धनासाठी गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ सह्याद्री मित्र संस्थेच्या माध्यमातून काम करणारे विश्वास तथा भाऊ काटदरे यांच्या कार्याविषयीची माहिती इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर महाड येथील सिस्केप संस्था आणि या संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांचीही माहिती या पुस्तकात अभ्यासक्रमासाठी देण्यात आली आहे.
भाऊ काटदरे संस्थापक असलेल्या सह्याद्री मित्र या संस्थेची व त्यांच्या कार्याची माहिती बारावीच्या अभ्यासक्रमात दिली गेल्याने चिपळूणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बारावीच्या इतिहासाचा अभ्यासक्रम यंदापासून बदलला असून, इतिहासाच्या पुस्तकात बदलता भारत-२ या विभागात पर्यावरण क्षेत्राच्या माहितीमध्ये सह्याद्री मित्र संस्थेच्या माध्यमातून भाऊ काटदरे यांनी कोकणात समुद्रकिनाऱ्यावर राबवलेली कासव संवर्धन मोहीम व समुद्र गारुड, पाकोळ्यांची घरटी, ऑलिव्ह रिडले या प्रजातींच्या संवर्धनासह प्राणी, पक्षी संवर्धनासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली आहे.