गुहागर एज्युकेशनच्या अध्यक्षपदी भोसले

By admin | Published: December 28, 2014 10:45 PM2014-12-28T22:45:25+5:302014-12-29T00:00:44+5:30

अत्यंत संतप्त वातावरणामध्ये या निवडणुकीला सुरुवात झाली.

Bhosale was elected president of Guhagar Education | गुहागर एज्युकेशनच्या अध्यक्षपदी भोसले

गुहागर एज्युकेशनच्या अध्यक्षपदी भोसले

Next

असगोली : गुहागर एज्युकेशन सोसायटी, गुहागर या नोंदणीकृत संस्थेची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या सन २०१५-१६ ते सन २०१९-२०च्या कालावधीसाठी नियंत्रण मंडळाच्या निवडणुकीमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेश भोसले, सचिवपदी उदय जोशी, तर खजिनदारपदी प्रसाद कचरेकर यांची एकतर्फे निवड झाली आहे.
आज सकाळी १० वाजल्यापासून अत्यंत संतप्त वातावरणामध्ये या निवडणुकीला सुरुवात झाली. या निवडणुकीला विरोधी अध्यक्षपदी असलेले उमेदवार पद्माकर आरेकर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलने या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने ही निवडणूक अध्यक्ष महेश भोसले यांच्या पॅनेलच्या बाजूने झाली. या निवडणुकीमध्ये एकूण २३०० मतदारांपैकी ८४५ मतदारांनी आपला हक्क बजाविला.
या निकालामध्ये अध्यक्ष महेश भोसले (८०६), पद्माकर आरेकर (२३), सचिव उदय जोशी (७७२), राजेंद्र आरेकर (३८), खजिनदार प्रसाद कचरेकर (७३६), मंदार आठवले (४९), मते मिळाली तर संचालक मंडळातील अनिल जोशी (७२०), ज्योती परचूरे (७११), दीपक कनगुटकर (७३२), प्रभाकर आरेकर (७२४), संदीप भोसले (७२५), महेश मोरे (७२३), मनिष खरे (७१२), राजेश गोयथळै (७०५), राकेश गोयथळे (७०२), स्नेहा परचुरे (७२४), सुरेश सावंत (७१४) अशी मते मिळाली आहेत.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संदीप देवकर, मिलिंद सुर्वे यांनी काम पाहिले, तर अध्यक्ष महेश भोसले यांनी स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Bhosale was elected president of Guhagar Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.