पाली ग्रामपंचायतीच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:12+5:302021-07-05T04:20:12+5:30
चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून पाली ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा योजनेतून तब्बल १६ लाख निधी मंजूर झाला आहे. या ...
चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून पाली ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा योजनेतून तब्बल १६ लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून ग्रामपंचायतीची इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते, तर माजी सभापती शौकत मुकादम यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
पाली गावाला ग्रामपंचायत इमारत नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सभांचे व कार्यालयीन कामकाज सुरू आहे. ग्रामस्थांचे स्वप्न होते की, गावामध्ये एक सुसज्ज चांगली ग्रामपंचायत असावी. हे स्वप्न आमदार निकम यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सरपंच अजय महाडिक, नंदकुमार महाडिक, विलास महाडिक, सचिन गमरे, सीताराम घाडगे, बावा सुर्वे, राजू शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र महाडिक, पूनम गमरे, अर्पिता महाडिक, विकास मोहिते, प्रमोद सुर्वे, सुभाष महाडिक, सूर्यकांत महाडिक, प्रमोद महाडिक, ग्रामसेविका स्वप्नाली चांदे उपस्थित होते.
--------------------------
चिपळूण तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती शाैकत मुकादम, सरपंच अजय महाडिक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते़