मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून आंदोलक निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 05:16 PM2023-04-28T17:16:38+5:302023-04-28T17:17:36+5:30

बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले.

Big news! Protest in barsu refinery project suspended for three days, protestors left in front of District Collector of Ratnagiri | मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून आंदोलक निघून गेले

मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून आंदोलक निघून गेले

googlenewsNext

रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांनी याची घोषणा केली आहे. याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले. या दरम्यान बारसूमध्ये आंदोलकांशी बोलण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आले होते. त्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस काही घोषणा होत नसल्याने आंदोलक त्यांच्यासमोरून निघून गेले. राजापूरमध्ये देखील दोन तास संवाद साधला होता.  प्रशासन तुमच्या सोबत आहे, समस्यांवर मार्ग निघू शकतील. प्रतिनिधींचे नावे द्या, आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलणे थांबविले. 

माती परीक्षण तीन दिवसांत थांबवा. तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन सुरु होईल. तीन दिवसांत पुन्हा चर्चा झाली नाही तर पुन्हा आंदोलन करणार असे स्थानिक नेते काशिनाथ गोरले यांनी सांगितले.

Web Title: Big news! Protest in barsu refinery project suspended for three days, protestors left in front of District Collector of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.