कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथील घटना
By अरुण आडिवरेकर | Published: February 14, 2024 06:32 PM2024-02-14T18:32:12+5:302024-02-14T18:32:50+5:30
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ...
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला. किरण विचारे असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. किरण हा वरवडे येथील असल्याचे समजते. तो आंबेड बुद्रुक येथील पोस्टाचा कर्मचारी असून काम आटोपून तो रत्नागिरीच्या दिशेने जात होता.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. यावेळी वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनर चालक एका गाडीला ओव्हरटेक करत असताना. समोरून दुचाकी (एमएच-०८-बीए-८५०४) ने येणाऱ्या किरण विचारे याला जोरदार धडक दिली. यामध्ये किरण दुचाकीसह कंटेनरच्या पुढील चाकाखाली सापडला. यातच त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वांद्री पोलिस पाटील सुनील शिगवण यांनी संगमेश्वर पोलिसांना याची माहिती देताच संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक बगळे, पोलिस अंमलदार राजेश शेलार, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हेड कॉन्स्टेबल सतीश कोलगे, अंमलदार मुजावर, अंमलदार पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.