दसपटीतील पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:40+5:302021-08-12T04:35:40+5:30

चिपळूण : दोन वर्षांपूर्वी तिवरे दुर्घटनेने चिपळूण पूर्व विभागातील दसपटी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आमदार ...

Billions of rupees sanctioned for ten bridges | दसपटीतील पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

दसपटीतील पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

Next

चिपळूण : दोन वर्षांपूर्वी तिवरे दुर्घटनेने चिपळूण पूर्व विभागातील दसपटी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी दसपटी परिसरातील पुलांसाठी अर्थसंकल्पामधून भरघोस निधी मंजूर करून आणला होता. या परिसरात अशा घटना नजरेसमोर ठेवून आमदार निकम यांनी आधीच नियोजन करून ठेवले होते.

कळकवणे तिवरे, आकले रस्त्यावरील १.४० किलाेमीटर मोठ्या पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ६० लाख, ०.७८० किलाेमीटर मोठ्या पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी आणि २.७३० किलाेमीटर छोट्या पुलाच्या दुरुस्तीसाठी ९० लाख मंजूर करून आणले आहेत. सोबत पिंपळी - नांदिवसे रस्त्यावरील लहान पुलाच्या पुनर्बांधणीसाठीही निधी मंजूर करून आणला होता. हा निधी पावसाळ्यानंतर उपयोगात आणून या पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

आता अतिवृष्टीत कळकवणे, तिवरे, आकले रस्त्यावरील ०.७८० किलाेमीटर लांबीचा पूल व पिंपळी नांदिवसे रस्त्यावरील लहान पूल अतिवृष्टीने वाहून गेला आहे. आमदार निकम यांनी या पुलांसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करून आणल्याने पावसाळ्यानंतर या पुलांची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Billions of rupees sanctioned for ten bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.