भाजपकडून भारतीय समाजसेवा केंद्राला साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:32+5:302021-03-19T04:30:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या भारतीय समाजसेवा केंद्राला भारतीय जनता पार्टी तालुका व शहरच्या वतीने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या भारतीय समाजसेवा केंद्राला भारतीय जनता पार्टी तालुका व शहरच्या वतीने आवश्यक साधनसामग्री व साहित्य पुरविण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक परिमल भोसले, नगरसेविका नुपुर बाचिम, रसिका देवळेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, भाजप युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणव वाडकर, भाजप शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक सोमनाथ सुरवसे, जिल्हा प्रसिद्धी संयोजक संदेश ओक, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक शुभम पिसे, शहर सरचिटणीस मधुकर निमकर, राम शिंदे, रत्नदीप देवळेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुयश पेटकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजप तालुका युवतीप्रमुख समीक्षा संदेश भालेकर, संदेश भालेकर, कुंदन खातू, अमेय सुर्वे, कल्पेश कोलते आदी उपस्थित होते.