मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचललाय : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:15+5:302021-06-26T04:22:15+5:30

चिपळूण : राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ...

BJP leaders take up Vida to end Marathi man: Bhaskar Jadhav | मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचललाय : भास्कर जाधव

मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचललाय : भास्कर जाधव

googlenewsNext

चिपळूण : राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे, असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते शुक्रवारी खेडमधील कोरेगाव येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आले असताना बोलत होते.

भास्कर जाधव पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला २०१९ मध्ये सत्तास्थापन करण्यात अपयश आले. तेव्हापासून भाजपच्या सुडाच्या राजकारणाचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची कृती, ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला संपवण्याचीच आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत. मग ते अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील.

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने चौकशी करावी, अशा पद्धतीचा ठराव होतो. छगन भुजबळ यांनी नुसते मत प्रदर्शित केले तर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात, तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जपून बोला. याचा अर्थ केंद्रातील सत्तेचा दुरूपयोग हा मराठी माणसाला संपवण्यासाठी भाजप करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. त्याचाच परिपाक म्हणजेच अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्या घरावर सातत्याने होणाऱ्या रेड आहेत, असे ते म्हणाले. भाजपच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: BJP leaders take up Vida to end Marathi man: Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.