भाजप पैशाचा वापर करून आमदार फोडू शकेल, मात्र..; शिवसेना आमदाराचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:52 PM2022-07-19T13:52:25+5:302022-07-19T13:52:52+5:30
शिवसेनेचे कोकणवासीयांसोबत अतूट नाते आहे. हे नाते कधीच तुटणार नाही.
आचरा : शिवसेनेने कोकणला भरभरून दिले आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कोकणवासीयांसोबत अतूट नाते आहे. हे नाते कधीच तुटणार नाही. शिंदे गटाच्या मागे पूर्णतः भाजप आहे. भाजप पक्ष पैशाचा वापर करून आमदार फोडू शकेल. मात्र, सर्वसामान्य जनतेला ते विकत घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील गोळवण, मसुरे, आचरा, आडवली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बैठका रविवारी झाल्या. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना संघटना वाढीसंदर्भात आमदार नाईक यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले, विकासकामांची माहिती दिली. याबैठकांना पदाधिकारी, शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गोळवण येथे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, कृष्णा आंगणे, भाऊ चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बी. जी. गावडे, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, काका गावडे, महिला विभागप्रमुख प्रज्ञा चव्हाण, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत, अजित पार्टे, अल्पेश निकम, शशांक माने, विजय धामापूरकर उपस्थित होते.
मसुरे येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपतालुकाप्रमुख छोटू ठाकूर, मर्डे सरपंच संदीप हडकर, विभागप्रमुख राजेश गावकर, उपविभागप्रमुख अमोल वस्त, उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, हडी शाखाप्रमुख संतोष अमरे, ग्रामपंचायत सदस्य पपू मुळीक, तर आचरा येथे विभागप्रमुख समीर लब्दे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपविभागप्रमुख जगदीश पांगे, अनिल गावकर, नारायण कुबल, उदय दुखडे, श्रीकांत बागवे, राजू नार्वेकर, राजू हिर्लेकर, वायंगणी सरपंच रेडकर, महिला विभागप्रमुख अनुष्का गावकर, आचरा माजी सरपंच शामसुंदर घाडी, श्रीकांत बागवे उपस्थित होते.
आडवली येथे उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, विभागप्रमुख बंडू चव्हाण, संतोष घाडी, दीपक राऊत, रामगड सरपंच विलास घाडीगावकर, अमित फोंडके, अरुण लाड, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, शाखाप्रमुख सुनील सावंत, दुलाजी परब, सुभाष धुरी, युवराज मेस्त्री, दीपक किर्लोस्कर, युवासेना विभागप्रमुख बंडू गावडे, आडवली सरपंच संतोष आडवलकर आदी उपस्थित होते.