भाजप कार्यकर्त्यांनी जनसंपर्कावर भर द्यावा
By Admin | Published: February 18, 2016 12:21 AM2016-02-18T00:21:06+5:302016-02-18T21:14:00+5:30
रामदास राणे : तालुकाध्यक्षांच्या चिपळुणात गावा-गावात बैठका सुरु
शिरगाव : विविध पक्षांचे कार्यकर्ते राजकारणातील घडामोडी पाहून संभ्रमावस्थेत आहेत. नागरिकांपर्यंत पोहोचून शासनाच्या विकास योजनांची अंमलबजावणी होईपर्यंत कार्यकर्त्यांनी जागरुक राहिले तर भारतीय जनता पार्टी काही महिन्यातच आपला प्रभाव दाखवेल. कोणाच्या पाठीमागे राहून काम करण्यापेक्षा पक्षाच्या विचारांची पाठराखण करावी. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असताना कार्यकर्त्यांनी जनसंपर्कावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष रामदास राणे यांनी गावभेट दौऱ्यात सांगितले. चिपळूण तालुक्यात शिरगाव, कुंभार्ली, कोंडफणसवणे गावात वाडी बैठकांवर भर देत नव्याने कार्यकर्ता जोडण्यात लक्ष घातले आहे. ब्राह्मणवाडी येथील बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजप पदाधिकारी झुल्फीकार पेवेकर उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते नितीन कोलगे यांनी शेतकरी व युवक यांना दिशा देणारा शेतकरी मेळावा आयोजन करण्याविषयी सूचना मांडल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सूचना जाणूनच मेळावा घेऊ, असे राणे यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या बैठकीत प्रकाश जोशी, कौस्तुभ जोशी, आनंद घडशी, चंद्रकांत गोवळकर, विजय सातपुते, नाना गोखले, प्रभाकर गोखले, मोहन साबळे, तुकाराम लांजेकर, हेमंत कोलगे, नाना शिंदे, सखाराम मेस्त्री, शंकर सावळकर, रुपेश लब्धे, संजय डेरवणकर, मनोहर कापडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोफळीतील वीज कामगार संघटनेचे अनिल बिडवाडकर, आत्माराम जाधव, राजन जाधव, भाजपा संघटन कार्यात सक्रिय आहेत. त्यामुळे भविष्यात अधिक वेगाने भाजपा पूर्व विभागात कार्यरत दिसेल, असा विश्वास बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)