राम मंदिर भूमिपूजनानिमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 08:23 PM2020-08-05T20:23:52+5:302020-08-05T20:40:43+5:30

कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे. याराम मंदिरासाठी रत्नागिरीकरांनीही योगदान दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी भाजपने बुधवारी प्रभू रामचंद्रांना वंदन करत आनंदोत्सव साजरा केला.

BJP's Anandotsav in Ratnagiri on the occasion of Ram Mandir Bhumi Pujan | राम मंदिर भूमिपूजनानिमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सव

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सव

Next
ठळक मुद्देराम मंदिर भूमिपूजनानिमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सवमारुती मंदिर येथे प्रतिमापूजन

रत्नागिरी : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे. या मंदिरासाठी रत्नागिरीकरांनीही योगदान दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी भाजपने बुधवारी प्रभू रामचंद्रांना वंदन करत आनंदोत्सव साजरा केला.

सकाळपासून रत्नागिरीत विविध ठिकाणी रामरक्षा पठण, श्रीराम प्रतिमेची पूजा करण्यात आली. तसेच आनंदोत्सवानिमित्त लाडू वाटप करण्यात आले.

शंखनाद आणि आरती करण्यात आली. जय श्रीराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे चिन्ह कमळ लिहिलेले मास्क सर्वांनी घातले होते.

या कार्यक्रमाला मारुती मंदिर येथे भाजपतर्फे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. ह्यराम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमानजीकी जय, अशा विविध देेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे घोषणाा दिल्या.

दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, प्रवीण देसाई, महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, चिटणीस राजू भाटलेकर, उपाध्यक्ष पिंट्या निवळकर प्राजक्ता रूमडे, नित्यानंद दळवी, प्रशांत डिंगणकर, शहर सरचिटणीस राजन पटवर्धन, मोहन पटवर्धन, मुकुंद जोशी, पमू पाटील, निशांत राजपाल, शिल्पा मराठे, ऋतूजा कुळकर्णी, संजय पुनसकर, शैलेश बेर्डे, नरेंद्र रानडे तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चा, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांनी घरावर भगवा ध्वज लावला होता. तसेच घरासमोर श्रीरामतत्त्वाची सात्त्विक रांगोळी काढली. तसेच सकाळी श्रीरामाची पूजा करताना तेलाचा दिवा लावला. दाराजवळ पणत्या लावल्या. कुटुंबातील सर्वांनी मिळून सामुहिक श्री रामरक्षास्तोत्र पठण केले.

 

Web Title: BJP's Anandotsav in Ratnagiri on the occasion of Ram Mandir Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.