चिपळुणात ग्रामसेवकांचे काळ्या फिती आंदोलन, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 05:03 PM2018-07-05T17:03:48+5:302018-07-05T17:10:48+5:30

खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला. चिपळुणातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

Black flip protest movement of Gramsevas in Chiplun, arbitrary development of rural development officials | चिपळुणात ग्रामसेवकांचे काळ्या फिती आंदोलन, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी

चिपळुणात ग्रामसेवकांचे काळ्या फिती आंदोलन, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी

Next
ठळक मुद्देचिपळुणात ग्रामसेवकांचे काळ्या फिती आंदोलनगटविकास अधिकाऱ्यांची मनमानीगुरुनाथ पारशे यांच्या कारभाराविरोधात संताप

चिपळूण : खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला. चिपळुणातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारशे हे दोन वर्षांपासून ग्रामसेवकांना तिरस्काराची वागणूक देत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामसेवकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवस गटविकास अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामसेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने खेड येथील गटविकास अधिकारी पारशे यांचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. पंचायत समितीच्या आढावा बैठकीत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

यावेळी तालुकाध्यक्ष आर. एम. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. के. शिंदे, विकास देसाई, मंगेश पांचाळ, अनिता पाटील, मंगेश पिंगळे, पराग बांद्रे, संदीप कदम, जितेंद्र कांबळी, भरत पेटकर, सुप्रिया मालगुंडकर आदींसह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.

Web Title: Black flip protest movement of Gramsevas in Chiplun, arbitrary development of rural development officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.