काळ्या फितीचे अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:20 AM2021-07-09T04:20:46+5:302021-07-09T04:20:46+5:30
सावर्डे : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चाैपदरीकरण पूर्ण व्हावे, या मागणीसाठी क्रांतिदिनी चिपळूण येथे मानवी साखळीसह काळ्या फितीचे ...
सावर्डे : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चाैपदरीकरण पूर्ण व्हावे, या मागणीसाठी क्रांतिदिनी चिपळूण येथे मानवी साखळीसह काळ्या फितीचे अभियान राबविले जाणार आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी चिपळूणच्या बहादूरशेख नाका येथून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. कोकण हायवे समितीतर्फे हे अभियान राबविले जाणार आहे.
शैक्षणिक साहित्याचे वाटप
देवरूख : ध्येयवादी युवा संघटनेतर्फे गरीब - गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेतर्फे नववीतील विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थापक सदस्य रणजित पवार, सरपंच यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
फुलझाडांची भेट
चिपळूण : शहरातील खेंड युवा सेनेतर्फे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेला फुलझाडांची भेट देत ‘झाडे जगवा, झाडे लावा’ हा संदेश देण्यात आला. नीलेश आवले यांच्याकडून ही फुलझाडे शाळेला देण्यात आली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्द्ल शाळेतर्फे आवले यांचे आभार मानण्यात आले.
पॅनल दुरूस्तीकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : जिल्हा परिषद भवनावर लावण्यात आलेल्या सोलर विद्युत संचाच्या १४ पॅनेलसह अन्य साहित्याचे तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. परंतु, या पॅनेलच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे अद्यापही दुर्लक्ष झाले आहे.
विद्यामंदिरमध्ये वृक्षारोपण
दापोली : ए. जी. पोवार स्मृती मंडळातर्फे आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या बहुजन हिताय विद्यामंदिरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनंत करंबेळे, आगरवायंगणी सरपंच दर्शना पवार, मुख्याध्यापक उमेश गायकवाड, आदी उपस्थित होते.