Ratnagiri: लोटेतील पुष्कर कंपनीत स्फोट, तीन कामगार जखमी

By अरुण आडिवरेकर | Published: July 18, 2024 06:32 PM2024-07-18T18:32:54+5:302024-07-18T18:33:30+5:30

आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्याेगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायजर्स कंपनीत स्फाेट हाेऊन आग लागल्याची घटना ...

Blast in Pushkar company in Lotte Ratnagiri District, three workers injured | Ratnagiri: लोटेतील पुष्कर कंपनीत स्फोट, तीन कामगार जखमी

Ratnagiri: लोटेतील पुष्कर कंपनीत स्फोट, तीन कामगार जखमी

आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्याेगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायजर्स कंपनीत स्फाेट हाेऊन आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. उत्पादन प्रक्रियेत लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली. आगीच्या घटनेनंतर जीव वाचविण्यासाठी धावत निघालेले तीन कामगार घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत.

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील पुष्कर केमिकल कंपनीच्या युनिट नं. १ मध्ये गुरुवारी सकाळी उत्पादन प्रक्रियेचे काम सुरु हाेते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या इथेनाॅल ऑक्साईड या कच्च्या मालाची पाइपलाइनद्वारे वाहतूक सुरु होती. पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने इथेनॉल ऑक्साईड साठवण केल्या जाणाऱ्या ठिकाणी स्फाेट झाला. या स्फाेटानंतर या वायूचा हवेशी संपर्क येताच आगीचा भडका उडाला.

या घटनेची माहिती औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पाेहाेचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळपास दीड तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. हा अपघात ज्या ठिकाणी झाला तिथे तीन कामगार काम करत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, ते घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली.

यापैकी संदीप मैती (वय ४०) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर घरडा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळावर खेडचे पोलिस व महसूलचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास खेड पाेलिस करत आहेत.

Web Title: Blast in Pushkar company in Lotte Ratnagiri District, three workers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.