आकेशियाच्या तोडीला खुलेआम आशीर्वाद

By admin | Published: July 16, 2014 11:01 PM2014-07-16T23:01:30+5:302014-07-16T23:05:29+5:30

मंडणगड तालुका : झाडी तोडण्याच्या नावाखाली वृक्षतोड

Bless openly | आकेशियाच्या तोडीला खुलेआम आशीर्वाद

आकेशियाच्या तोडीला खुलेआम आशीर्वाद

Next

मंडणगड : वन विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील काही लाकूडमाफियांनी बांधकाम विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन रस्त्याशेजारील आकेशिया झाडांची खुलेआम कत्तल सुरू ठेवली आहे.
काही वर्षांपूर्वी शासनाने रस्त्याशेजारी आकेशियाची झाडे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. आता ही झाडे मोठी झाली असून, या झाडांची खुलेआम कत्तल करण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली आकेशियाची सर्व झाडे तोडण्याचे सत्र गेल्या आठवड्यात सुरु झाले असून, यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही प्रमुख रस्त्यांशेजारी सुरू असलेली वृक्षतोड अद्याप थांबलेली नाही. सावरी घोसाळे पट्ट्यातील गावांमधून आकेशियाची तोड करुन गाड्या भरुन जात असल्याची तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत़
यासंदर्भात बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाड तोडण्यासाठी कुठलाही अधिकृत लिलाव केलेला नाही. मात्र, वाहतुकीस अडचण करणारी वाकलेली झाडे तोडण्याची सूचना येथील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात दिल्याची माहिती मिळाली आहे.
कायदा व प्रक्रियेला बगल देऊन बांधकाम विभागाने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असली तरी वृक्षतोड करताना बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थितच न राहिल्याने वाहतुकीस अडथळा असलेली झाडे वगळता इतर सर्व झाडे तोडून साफ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वृक्षतोडीसाठी पुढे असलेल्या लाकूडमाफियांना येथील वनखात्याच्या प्रमुखाचा पाठिंबा असल्याचेही स्पष्ट होत आहे. बांधकाम विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने असे प्रकार घडत असल्याचे येथील अभियंत्यांचे मत आहे. दुसरीकडे कोणत्याही प्रक्रियेशिवाय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीचे आदेश निर्गमित केलेच कसे? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bless openly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.