कडवई येथील शिबिरात ५१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:33+5:302021-05-14T04:30:33+5:30
देवरुख : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कडवई जिल्हा परिषद गटातील ९वे रक्तदान शिबिर आमदार शेखर निकम यांच्या ...
देवरुख : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कडवई जिल्हा परिषद गटातील ९वे रक्तदान शिबिर आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना रक्तदान मोहीम घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्याच्या मोहीम राबविल्या जात आहेत.
या मोहिमेचा एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या रक्तदान मोहिमेमध्ये ७५ जणांनी सहभाग नोंदवून त्यामधील ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनावेळी आमदार शेखर निकम, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, अनिरुद्ध निकम, तुरळच्या सरपंच राधिका गिजये, उपसरपंच शंकर लिंगायत, कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच संतोष भडवळकर, संतोष जाधव, रमेश डिके, दिलीप म्हादे, वसंत कदम, लीलाधर पंडित, संदीप चरकरी, काशीराम हरेकर, धोंडू डिके, राजेंद्र बोथरे, ग्रामविकास अधिकारी विनायक राजेर्शिके, पोलीस पाटील, वर्षा सुर्वे उपस्थित होते.