चिपळुणात ५८ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:14+5:302021-05-09T04:32:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहर व तालुका काँग्रेस आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी व अपरांत हॉस्पिटल चिपळूण यांच्या विशेष ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहर व तालुका काँग्रेस आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी व अपरांत हॉस्पिटल चिपळूण यांच्या विशेष सहकार्याने अपरांत हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलेे. या शिबिरात तब्बल ९५ दात्यांची रक्तदानासाठी नोंद झाली होती. त्यापैकी ५८ दात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय रेडीज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय भोसले, भरत लब्धे, अशोक जाधव, चिपळूण इंदिरा काँग्रेसचे शहर अध्यक्ष लियाकत शाह, चिपळूण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक कबीर काद्री, करामत मीठागरी, नगरसेविका सफा गोठे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश राऊत, प्रदेश महिला पदाधिकारी सोनलक्ष्मी घाग, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, अभिजित कांबळे, महेश मांडके, महिला शहराध्यक्ष आर्या कदम, नीलम शिंदे, स्नेहा आंबले, महादेव चव्हाण, मैनुद्दीन सय्यद तसेच काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ. यतीन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.