चिपळुणात १९ ला रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:48+5:302021-04-15T04:29:48+5:30
अडरे : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आवाहनाला ...
अडरे : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील राजकीय पक्ष, सामाजिक व शिक्षक संघटनांनी एकत्र येत १९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील भोगाळे येथील अपरांत हाॅस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यात नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर होणार आहे. चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस, अपरांत हाॅस्पिटल, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, पुरोगामी प्राथमिक शिक्षण संघटना व इतर अनेक विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. या शिबिरात सहभाग घेण्याऱ्या रक्तदात्यांनी आपली नावे मनोज जाधव, प्रशांत देवळेकर, अमोल टाकळे, सिद्धेश लाड, विश्वनाथ कांबळे, समरिन घारे, राजेश दांडेकर यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.