चिपळुणात १९ रोजी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:21+5:302021-04-16T04:31:21+5:30
चिपळूण : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून १९ एप्रिल ...
चिपळूण : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून १९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शहरातील अपरान्त रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अपरांत हॉस्पिटल, रोटरी क्लब चिपळूण, रोटरॅक्ट क्लब चिपळूण, माध्यमिक अध्यापक संघ, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षक परिषद संघटना, शिक्षक भारती संघटना, शिक्षण क्रांती संघटना, चिपळूण तालुका खो - खो असोसिएशन आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी मनोज जाधव, प्रशांत देवळेकर यांच्याशी संपर्क साधून आपली नावे १७ एप्रिल रोजी दुपारी १२ पर्यंत नोंदवावीत. तसेच रक्तदान शिबिराला येताना मास्कसह ओळखपत्राचा पुरावा घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.