मंडल कार्यालयधोक्याच्या जागेत

By admin | Published: July 17, 2014 11:48 PM2014-07-17T23:48:00+5:302014-07-17T23:54:59+5:30

दुर्लक्षाचा कळस : महसूल खात्याला काळजीच नाही

Board office | मंडल कार्यालयधोक्याच्या जागेत

मंडल कार्यालयधोक्याच्या जागेत

Next

पाचल : दरवर्षी लाखो रुपये महसूल गोळा करणारे पाचल मंडल अधिकारी कार्यालय स्वत:च्या मालकीच्या इमारतीपासून आजपर्यंत वंचित आहे. हे कार्यालय वर्षानुवर्षे मोडकळीस आलेल्या शासकीय गोदामातच सुरू असून, ते बदलण्याच्या मागणीकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाले आहे.
पाचल मंडल अधिकारी कार्यालय पाचल (ता. राजापूर) बाजारपेठेत शासकीय जमिनीत ब्रिटिशकालीन धान्य साठवण गोदामाच्या इमारतीत सुरु आहे. ब्रिटिश सरकार १५ आॅगस्ट १९४७ या मध्यरात्री देशातून पायउतार झाले. त्यांनी त्यांच्या काळात बनवलेल्या इमारती असोत वा पूल. त्यांचे आयुष्यमान लांबलचक असल्याचे कामाच्या दर्जावरून सिद्ध करुन दाखवत आहेत. अशीच एक इमारत पाचल गावात ब्रिटिश काळात धान्य गोडाऊन म्हणून बांधण्यात आली. तिचा वापर आता मंडल अधिकारी कार्यालय करत आहे.
पाचल मंडल कार्यालय ज्या इमारतीत सुरु आहे ती इमारत आता धोकादायक झाली आहे. इमारतीला पूर्ण तडे गेले आहेत. इमारत धोकादायक झाल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना काम करणे जोखमीचे झाले आहे. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत दरवर्षी लाखो रुपये महसूलच्या नावाने हे कार्यालय शासन दरबारी जमा करत आहे. शासनाची प्रशस्त जागा उपलब्ध आहे, असे असताना मंडल अधिकारी कार्यालयाला स्वमालकीची इमारत उपलब्ध नाही. एका बाजूने महसूल गोळा करताना भिंतीच्या छताखाली काम करणारे कर्मचारी, तर अनेक वेळा भेट देऊनही दुर्लक्ष करणारे वरिष्ठ कार्यालय अशी व्यथा झाल्याने ही जुनी इमारत हा भार कधीपर्यंत सोसणार आहे, असा अनुत्तरीत प्रश्न उभा राहतो. सुमारे ५ गुंठ्यापेक्षा जास्त जागा उपलब्ध असताना त्याचा नियोजनपूर्ण वापर होत नसल्याने मंडल अधिकारी कार्यालय स्वमालकीच्या इमारतीला मुकले आहे. अर्जुना मध्यम प्रकल्प पूर्णत्त्वास जात आहे. जामदा प्रकल्प सुरु होण्याच्या स्थितीत आहे. दोन्ही प्रकल्प याच मंडल कार्यक्षेत्रात येतात. इथले कर्मचारी, अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालय यांची इच्छाशक्ती दांडगी असती तर दोन्ही प्रकल्पात या मंडल कार्यालयाची इमारत पूर्ण झाली असती. परंतु असे घडताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांना डावलून दलालांमार्फत जमीनमाफियांना १००च्या पटीत ७/१२ दिले जातात. तेसुद्धा सहज सोप्या पद्धतीने. परंतु ज्या धोक्याच्या इमारतीत आपण आपले काम करत आहोत, ती इमारत आपल्यावर कधीही कोसळू शकते, याची कल्पना नसावी, याचे आश्चर्य वाटते. (वार्ताहर)

Web Title: Board office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.