Tauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 05:38 PM2021-05-17T17:38:10+5:302021-05-17T17:42:57+5:30

Tauktae Cyclone Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे.

Boat damage due to strong winds at Jaigad | Tauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान

Tauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान

Next
ठळक मुद्देजयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसानमिरकरवाडा येथे वाहनांचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे.

वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नौका एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. भीतीपोटी मच्छिमारांनी रात्र जागून काढली.

मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या वादळाचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने व खवळलेल्या समुद्राने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छिमाराची नांगरून ठेवलेली बोट रविवारी रात्रीच्या सुमारास बुडाली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे.

जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान
- मिरकरवाडा येथे वाहनांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

Web Title: Boat damage due to strong winds at Jaigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.