दाभोळ बंदरात बोट पेटली, खलाशी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:11 PM2020-04-21T22:11:55+5:302020-04-21T22:15:54+5:30
मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दाभोळ खाडीत उभ्या असलेल्या एका बोटीला अचानक आग लागली.
दाभोळ (दापोली) : दाभोळ खाडीच्या बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला अचानक आग लागल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. सुदैवाने खलाशांनी पाण्यात उड्या घेतल्याने जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
काही नियमांचे पालन करुन मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नौकामालकांनी त्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दाभोळ खाडीत उभ्या असलेल्या एका बोटीला अचानक आग लागली.
ही बोट रत्नागिरी तालुक्यातील तेरेवायंगणी येथील चंद्रकांत शिगवण यांची मालकीची आहे. बोटीवर तीन खलाशी होते. त्यांनी लगेचच पाण्यात उड्या मारल्या. मात्र बोटीत अजून कोणी आहे का हे पाहण्यासाठी काही अन्य बोटी तेथे गेल्या आहेत. यात बोटीचे खूप नुकसान झाले आहे.