Video : आंजर्ले येथे बोट बुडाली, सुदैवाने मच्छीमारांनी पोहून गाठला किनारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:10 PM2021-09-06T14:10:58+5:302021-09-06T14:21:26+5:30
The boat sank in the sea : सुदैवाने बोटीवरील आठही मच्छीमारांनी पोहून किनारा गाठला.
दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे खाडीच्या मुखाशी मासेमारी बोट बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली. सुदैवाने बोटीवरील आठही मच्छीमारांनी पोहून किनारा गाठला. या बोटीला वाचवण्यासाठी गेलेली बोटही ओहोटीमुळे वाळूत रुतली होती. मात्र, त्याचदरम्यान भरती आल्यामुळे आणि किनाऱ्यावरील लोकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही बोट वाचली.
मासेमारीसाठी गेलेल्या एका बोटीचे इंजिन आंजर्ले येथे खाडीच्या मुखाशी बंद पडले. ओहोटी असल्याने मच्छीमारांना ती बोट किनाऱ्याकडे आणणे शक्य नव्हते. ही बाब किनाऱ्यावरील लोकांच्या लक्षात आल्यानंतर दुसरी एक बोट त्यांना वाचवण्यासाठी गेली. मात्र ओहोटी असल्याने मदतीला जाणारी बोट वाळूत रुतली. त्यामुळे किनाऱ्यावरील लोकांनी दोरीच्या सहाय्याने या बोटीला वाचवण्याचे काम सुरू केले. हा प्रकार होईपर्यंत इंजिन बंद पडलेली बोट पाण्यात बुडू लागली. त्यावर आठ मच्छीमार होते. त्यांनी पाण्यात उडी घेऊन किनारा गाठला. यादरम्यान भरती सुरू झाल्यामुळे वाळूत अडकलेली बोटही सुटली आणि ती किनाऱ्यावर परत आणण्यात आली.
दापोलीनजीक बोट बुडाली, मच्छीमारांनी पोहून गाठला किनारा pic.twitter.com/sIeJWjbzEz
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
रत्नागिरीत आंजर्ले समुद्रामध्ये बोट बुडाली pic.twitter.com/RhXOyyZraj
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021