संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:27 PM2020-03-26T21:27:10+5:302020-03-26T21:27:47+5:30
पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.
गुहागर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आल्याप्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.
पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.
वरवडेत आले ३४ ग्रामस्थ
मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन दोन नौका विनापरवाना वरवडे (ता. रत्नागिरी) येथेही दाखल झाल्याचे उघड झाले आहे. दोन मासेमारी बोटीतून तब्बल ३४ माणसे अनधिकृतरित्या वरवडेतील तिवरी बंदरात उतरल्याचे पुढे आले आहे. कोणतीही तपासणी न करता त्यांनी गावात प्रवेश केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तक्रार केली. त्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर ३४ जणांवर जमावबंदी आदेश धुडकावल्याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच दोन्ही बोट मालकांवरही होणार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.