सवतसडा धबधब्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली;आत्महत्या असल्याचा अंदाज

By संदीप बांद्रे | Published: December 5, 2023 07:02 PM2023-12-05T19:02:48+5:302023-12-05T19:03:02+5:30

मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला ते पाहता हा घातपात असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे.

body found in sawatsada waterfall identified in chiplun | सवतसडा धबधब्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली;आत्महत्या असल्याचा अंदाज

सवतसडा धबधब्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली;आत्महत्या असल्याचा अंदाज

संदीप बांद्रे, चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून चैतन्या चंद्रकांत मेटकर(३४)असे त्या मृत महिलेचे नाव आहे. तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र धबधब्यात आता पाणी नसताना आणि मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला ते पाहता हा घातपात असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे.

चैतन्या चंद्रकांत मेटकर (३४) या विवाहित महिलेचा हा मृतदेह असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. परशुराम घाटाजवळ असलेल्या सवतसडा धबधबा या ठिकाणी असलेल्या दगडाच्या रांजणात या महिलेचा मृतदेह मिळाला मिळाला होता. अडकलेले स्थितीत हा मृतदेह मिळाल्याने या सगळ्या प्रकाराबद्दल अपघात की घातपात या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला या महिलेचे नाव कळत नसल्याने हा मृतदेह कोणाचा ही महिला कोण? हा सगळा प्रकार काय आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते होते.

मात्र चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या मृतदेहाचे नाव आणि अन्य प्राथमिक माहिती मिळवली आहे. ही महिला नातेवाईकाकडे जाते असे सांगून घरातून निघाल्याची चर्चा परिसरात आहे. सोमवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानंतर चिपळूण पोलीस स्थानकात या सगळ्या घटनेची नोंद करण्यात आली. ही महिला परशुराम येथील पायरवाडीत राहणारी आहे. या महिलेचा पती हा मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे. या महिलेला एक लहान मुलगा असून ती गावी आपले सासरे, दीर, जाऊ आणि दिराची दोन मुले या कुटुंबासमवेत राहत होती. मात्र ही महिला घरातून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची खबर चिपळूण पोलिसांना देण्यात आली होती का? ही महिला त्या ठिकाणी नेमकी कोणत्या कारणासाठी गेली? किंवा तिने स्वतःहून काही जीवाचे बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला का? की त्या ठिकाणी गेल्यावर तिचा पाय घसरून मृत्यू झाला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या सगळ्या अनुषंगाने चिपळूण पोलीस तपास करत आहेत.

Web Title: body found in sawatsada waterfall identified in chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.