खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने

By अरुण आडिवरेकर | Published: September 21, 2022 12:07 PM2022-09-21T12:07:59+5:302022-09-21T12:08:43+5:30

रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते.

Bombay gold merchant disappeared from Ratnagiri | खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने

खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने

Next

रत्नागिरी : व्यावसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले मुंबईतील प्रसिद्ध सोने - चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची माहिती रत्नागिरीत पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई येथून व्यावसायिक कामासाठी सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी (५५) हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले आहेत. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून, ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते. आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये ते राहिले होते. सोमवारी रात्री ते एमजी रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नाही. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने होते, अशी चर्चा आहे.

सोमवारी रात्रीनंतर नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांजवळ  चौकशी केली. मात्र, कोणतीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी थेट रत्नागिरी गाठली. कीर्तिकुमार यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत असून, पोलिसांना  याबाबत माहिती देण्यात आली आहे. कीर्तिकुमार यांचे वास्तव्य ज्या लॉजमध्ये होते तिथे ते सोमवार पासून परत न आल्याचे सांगितले जात आहे. लॉजच्या खोलीत फक्त त्यांचे सामान आहे.

रत्नागिरी येथील राम नाक्यात सोमवारी एका व्यावसायिकाला तिघांनी लुटले होते. तर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील माळनाका येथे एका महिलेला लुटाण्यात आले. पाठोपाठ घडणाऱ्या लुटीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता व्यावसायिकच गायब झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Bombay gold merchant disappeared from Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.