Ratnagiri: २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी, मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

By मनोज मुळ्ये | Published: March 29, 2023 05:41 PM2023-03-29T17:41:11+5:302023-03-29T17:41:43+5:30

मंडल अधिकारी आणि तलाठी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु

Bribery department arrested Talathi, mandal officer while accepting bribe of 25 thousand in Ratnagiri | Ratnagiri: २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी, मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

Ratnagiri: २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी, मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

googlenewsNext

देवरुख : वडिलोपार्जित शेतजमिनीत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करुन ते मंजूर करण्याकरिता २५ हजाराची लाच घेणारा मंडल अधिकारी आणि तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर (वय- ४६ ) आणि कनकाडी सजाचे तलाठी संतोष महादेव मोघे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील एका तरुणाने वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर स्वतःचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्याचे प्रकरण दाखल केले होते. ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तलाठी मोघे यांनी २८ फेब्रुवारी रोजी लाच म्हणून मोबाईल फोनची मागणी केली होती. ही नोंद मंजूर करण्याकरिता मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर यांनी २८ फेब्रुवारी आणि १३ मार्च २०२३ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 

तक्रारदार तरुण आणि मंडल अधिकारी यांच्यात चर्चा होऊन बुधवार २९ मार्च रोजी व्यवहार निश्चित झाला. त्यानुसार बुधवारी मंडल अधिकारी मुरुडकर याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा रचून लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मंडल अधिकारी आणि तलाठी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे .

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलिस नाईक संतोष कोळेकर, पोलिस नाईक दीपक आंबेकर, पोलिस हेमंत पवार, राजेश गावकर, प्रशांत कांबळे यांनी ही कारवाई केली. 

Web Title: Bribery department arrested Talathi, mandal officer while accepting bribe of 25 thousand in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.