बजेट कोलमडलेलेच
By admin | Published: September 14, 2014 09:54 PM2014-09-14T21:54:23+5:302014-09-14T23:54:46+5:30
आठवड्यात दर दुप्पट : भाज्यांचे दर अजूनही महाग
रत्नागिरी : दररोजच्या आहारात भाजीपाला शिजवला जातो. परंतु भाजीपाल्याचे दर पुन्हा कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मटारच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. २०० रूपये किलो दराने मटारची विक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात २० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू होती. मात्र, या आठवड्यात त्याच टोमॅटोचा दर दुप्पट झाला आहे. ४० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे.
आहारात पालेभाज्या किंवा भाज्यांचा प्रामुख्याने वापर करण्याची आवश्यकता असताना भाज्यांचे दर मात्र कमालीचे वाढले आहेत. कोबी ३० रूपये, वांगी ४० रूपये, सिमला मिरची ६० रूपये, फरसबी ६० रूपये, गवार ६० रूपये, फ्लॉवर ५० रूपये, हिरवी मिरची ६० रूपये, भेंडी ७० रूपये, काकडी ४० रूपये, बीट ४० रूपये, गाजर ६० रूपये, घेवडा ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. मेथी, पालक, शेपू, चवळी, माठ जूडी १५ रूपये दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जूडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे.
गावठी भाज्यादेखील बाजारात विक्रीस येऊ लागल्या आहेत. भोपळ्याची शेड १० ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. दोडके, पडवळ यांची २० ते २५ रूपये नग दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा ३० ते ३५ रूपये दराने विकले जात आहेत. शिवाय छोट्या काकड्यांची २० रूपये वाटाप्रमाणे विक्री सुरू आहे. मोठ्या काकड्या ४० रूपयांपासून १२० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून महिला गावठी भाज्या विक्रीला आणतात. त्यामुळे शहरातील नाकानाक्यावर भाजी विके्रत्या दिसून येत आहेत. भेंडीची १५ रूपयाने ३ जुड्या विकण्यात येत आहेत.
मटारच्या दराने उच्चांक गाठला आहे. ५० रूपये पाव किलो दराने मटार विकण्यात येत आहेत. कोवळा मटार असून, दरही वधारलेला आहे. बहुतांश ग्राहक फ्रोजन मटार खरेदी करत आहेत. टोमॅटोचा वापर नियमित केला जातो. ४० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी वर्गाचे हाल होत आहेत.
गत आठवड्यात २० रूपये किलो दराने विक्री होती. परंतु या आठवड्यात दुप्पट वाढ झाली आहे. कांदा ३० ते ४० रूपये, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
सामान्यांवर परिणाम
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
आठवड्यात दुपटीने दर वाढले.
एकदम दर वाढण्याचे कारण गुलदस्त्यात.
पालेभाज्या महागल्या तर करायचे काय हा गृहिणींसमोर प्रश्न.
कोबी, वांगी, फरसबी महाग.
पितृपक्षात महागाईने केला कहर.
ग्रामीण भागातून महिला येतात काकड्या चिबूड घेऊन
गावठी भाज्यांना मागणी वाढतेय .
मटार २०० रूपये किलो
टोमॅटो ४० रूपये किलो