फसवणूकप्रकरणी बिल्डर्सवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 09:52 PM2020-12-12T21:52:31+5:302020-12-12T21:54:27+5:30
Crimenews, Fraud, police, ratnagirinews ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे. १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
देवरुख : ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे. १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखचे शाखाधिकारी जयेश विलास जोशी यांनी दिली आहे. या फिर्यादीमध्ये जयसिंग गोपाळराव राणे, प्रोप्रा. राणे होम्स बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स यांच्या विरोधात १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जयसिंग राणे यांनी ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था, शाखा देवरुखमध्ये जात आपण राणे होम्स बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स असल्याचे सांगत विश्वास संपादन केला व पतसंस्थेकडे नवीन वाहन तारण कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी १५ लाख रुपये कर्जाकरिता अर्ज केला. त्यासोबत संस्थेला आवश्यक असणारी कागदपत्रे (दस्तऐवज) खोटी व बनावट तयार करुन ती खरी आहेत, असे भासवले आणि ती कागदपत्रे कर्ज मंजुरीकरिता पतसंस्थेमध्ये जमा करुन कर्ज मंजूर करुन घेतले. त्या कर्जाच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत १७ लाख ६५ हजार ३०२ रुपये व्याजासह परफेड न करता, त्यांनी पतसंस्थेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जामधून खरेदी केलेल्या वाहनाची रजिस्ट्रेशन कागदपत्रेही तारण म्हणून जमा केलेली नाहीत. गाडी घेतल्यापासून आजपर्यंत त्यांनी कधीही गाडीचे हप्ते जमा केलेले नसल्याचेही जयेश जोशी यांच्या या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
खोटी कागदपत्रे देऊन संस्थेची दिशाभूल करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंग राणे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १९९, २००, १९३ (२), ४०५, ४०६, ४१५, ४१७, ४२०, ४२१, ४२२, ४२७, ४६४, ४६७, ४६८, ४६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १० जुलै २०१५ ते १९ ऑगस्ट २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करत आहेत.