खवटीत हायस्कूलची इमारत खचली

By admin | Published: March 6, 2015 12:21 AM2015-03-06T00:21:30+5:302015-03-06T00:24:01+5:30

४ लाखांचे नुकसान

The building of the High School High School collapsed | खवटीत हायस्कूलची इमारत खचली

खवटीत हायस्कूलची इमारत खचली

Next

खेड : तालुक्यातील खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या मालकीची हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत बुधवारी रात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने जीवितहानी झाली नाही. ही इमारत सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाच्या दणक्याने कोसळल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे़

मुंबई - गोवा महामार्गावरील गजबजलेल्या अशा भागात खवटी पंचकोशी शिक्षण संस्थेच्या मालकीची ही इमारत उभी आहे. १९९९मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. सध्या या इमारतीमध्ये इयत्ता दहावीचे दोन वर्ग आहेत. या दोन वर्गात एकूण १०२ विद्यार्थी आहेत. याच इमारतीमधील दहावी अ आणि (ब)चा वर्ग कोसळला आहे. ही घटना रात्रीची घडली असावी, असा तर्क ग्रामस्थांनी केला आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. खवटी प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग प्रशालेत सुरू आहेत.

गुरुवारी सकाळी ७ वाजता हे वर्ग सुरू होतात. गुरूवारी नेहमीप्रमाणे कशेडी येथील विद्यार्थी या जादा वर्गासाठी प्रशालेत ६.४५ वाजता आले होते. मात्र, यावेळी दहावीचे वर्ग कोसळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संस्थेचे अध्यक्ष सुनील दळवी यांना दूरध्वनीद्वारे कळविले. दळवी यांनी यावेळी संस्थेचे सचिव कैलास यादव, खजिनदार संतोष ंिशंदे, सुभाष दळवी, चंद्रकांत दळवी, महादेव दळवी, लक्ष्मण दळवी, विलास दळवी, सुरेंद्र दरेकर यांच्यासह ग्रामस्थांना सोबत घेऊन दुर्घटनेची पाहणी केली.

अवघ्या १५ वर्षांत ही इमारत कोसळली. याबाबत सर्वच जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. जमीन खचल्याने ही इमारत कोसळल्याचे दळवी यांनी सांगितले आहे. याबाबत आपण तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना कळविले आहे. मात्र, सायंकाळपर्यंत कोणीही भेट दिली नाही. कदाचित ते शुक्रवारी भेट देण्याची शक्यता इळवी यांनी वर्तवली आहे़

या दुर्घटनेतील दहावीचे वर्ग कोसळल्याने या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था संकटात सापडली आहे. परीक्षा काळामध्ये या विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेण्यासाठी अन्य ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The building of the High School High School collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.