अपेक्षांचे ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:50+5:302021-07-17T04:24:50+5:30
त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जसे की, कोणी आपल्याला आनंदी ठेवणं, हे आपल्या हातात नाही, परंतु ...
त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जसे की, कोणी आपल्याला आनंदी ठेवणं, हे आपल्या हातात नाही, परंतु दुसऱ्यांना आनंद देणे आपल्या हातात आहे. कोणी आपल्याला मदत करेल, हे आपल्या हातात नाही, परंतु, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, आपल्या हातात आहे. कोणी आपल्यावर प्रेम करावे, हे आपल्या हाती नाही, परंतु दुसऱ्यांवर अकारण प्रेम करणे, हे आपल्या हातात आहे. सुख देण्यात आहे. सुख मिळेल ही अपेक्षा दु:खदायी आहे. म्हणून, सुखाची अपेक्षा करत त्याच्यामागे धावू नका. सुख, आनंद, प्रोत्साहन इतरांना देत राहा, त्याचा आनंद तुम्हालाही नक्की मिळेल. या सर्वांसाठी अपेक्षांच्या ओझ्याखाली जगणे बंद केले, तर हा आनंद निश्चित मिळेल.
- डॉ. गजानन पाटील