कालव्यासाठी ठेवलेल्या पाईप वणव्यात जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:51+5:302021-04-30T04:39:51+5:30
तालुक्यातील हरळ गावातील माळरानावर वणवा लागला. दुपारची कडकडीत उन्हाची वेळ, सुकलेले गवत आणि वारा यामुळे काही वेळातच वणवा भडकला ...
तालुक्यातील हरळ गावातील माळरानावर वणवा लागला. दुपारची कडकडीत उन्हाची वेळ, सुकलेले गवत आणि वारा यामुळे काही वेळातच वणवा भडकला आणि संपूर्ण माळरान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत अर्जुना धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यासाठी ठेवलेल्या पाईपही जळून खाक झाल्या.
अर्जुना नदीच्या खोऱ्यात अर्जुना मध्यम प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. या धरणाचा डावा कालवा तळवडे, ताम्हाणे, रायपाटण, बागवेवाडी, परटवली, ओशिवळे येथून जाणार आहे. तर उजवा कालवा कारवली, पाटकरवाडी, पाचल, हरळ, परुळे, आरगाव, कोंडगाव, व्हेळ, विलवडे, वाघनगाव येथून जाणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्या कालव्यांची कामे सुरू आहेत. कालव्यांमध्ये टाकण्यासाठीच खोदाई करून त्यामध्ये मोठ-मोठ्या पाईप टाकण्यात येत आहेत. अशाच काही पाईप हरळ येथे माळरानावर ठेवण्यात आल्या होत्या. वणव्यात या पाईप जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.