मुंबई -गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बर्निंग कार, पाचजण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 12:07 PM2020-12-15T12:07:53+5:302020-12-15T12:56:57+5:30
Burning car : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मारुती सुझुकी बलेनो कारने अचानक पेट घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
खेड - मुंबई - गोवा महामार्गावरील भाेस्ते घाटात मारुती सुझुकी बलेनो कारने अचानक पेट घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतून ५ जण बालंबल बचावले. अवघ्या अर्ध्या तासात या कारचा अक्षरश: कोळसा झाला.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होत वाहनांचा वेग मंदावला होता. मंडणगडहुन आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रवास करत होते. ते सर्वजण रत्नागिरीला जात असताना मारुती बलेनो कारने भोस्ते घाट चढताना अचानक गाडीने पेट घेतला.
गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर धाव घेतली. त्यानंतर काही क्षणात गाडी जळून खाक झाली. या कारमधून दोन महिला आणि तीन पुरुष असे पाचजण प्रवास करत होते.