चालकाला डुलकी आल्याने बस उलटली, सिंधुदुर्गातील आठ प्रवासी जखमी; संगमेश्वर येथील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:51 PM2024-09-09T12:51:08+5:302024-09-09T12:52:20+5:30

जखमी सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते

Bus overturns after driver fell asleep, eight passengers injured in Sindhudurg | चालकाला डुलकी आल्याने बस उलटली, सिंधुदुर्गातील आठ प्रवासी जखमी; संगमेश्वर येथील दुर्घटना

चालकाला डुलकी आल्याने बस उलटली, सिंधुदुर्गातील आठ प्रवासी जखमी; संगमेश्वर येथील दुर्घटना

देवरुख (जि.रत्नागिरी) : चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातातसिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. हे सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते. हा अपघात शनिवारी दुपारी संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे झाला. या अपघातप्रकरणी चालक राजेंद्र उखा वाघ यांच्यावर संगमेश्वर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातप्रकरणी कैलास अशाेक साबळे यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात सुधीर सदाशिव मसूरकर (४०), प्रमिला सुधीर मसूरकर (३२), वीर सुधीर मसूरकर (१०), कार्वी सुधीर मसुरकर (५), प्रिया प्रकाश राणे (५१), वैभव प्रकाश राणे (३०), प्रवीण शंकर सावंत (४९) आणि विद्या प्रवीण सावंत (४९, सर्व रा.कणकवली, सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत.

हे सर्वजण गणपतीसाठी गावाला येत हाेते. बसचालक राजेंद्र वाघ हे शनिवारी इगतपुरी येथून अंधेरी ते सावंतवाडी (एमएच १४, बीटी १७०८) ही गाडी घेऊन सिंधुदुर्गकडे जात हाेते. मुंबई-गाेवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे बस आली असता, चालक वाघ यांना डुलकी आली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली.

Web Title: Bus overturns after driver fell asleep, eight passengers injured in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.