बसफेऱ्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:59+5:302021-05-30T04:24:59+5:30
खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर ...
खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होऊ लागल्याने खेड बस आगारातून सकाळी १० वाजता खेड-बोरीवली आणि खेड-पुणे-पिंपरी-चिंचवड या दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांची लगबग
मंडणगड : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी आता या हंगामाची तयारी करीत आहेत. खरीप हंगाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बी-बियाणे विक्री केंद्र दिवसभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सर्व केंद्रांवर शेतकरी बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत.
दिशादर्शक फलक गायब
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दिशाफलक बसविण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळात हे कमी जाडीचे दिशादर्शक फलक भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अपघात कमी व्हावेत म्हणून रस्त्याशेजारी असलेले फलकही गायब झाले आहेत.
रुग्णवाढीने चिंता व्यक्त
रत्नागिरी : जिल्ह्यात काही अंशी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली येत आहे. परंतु काही तालुक्यांमध्ये अजूनही ही संख्या कमी-जास्त होत आहे. काही वेळा रुग्णसंख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळतो. मात्र पुन्हा थोड्या दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येच्या वाढीने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ग्राहकांची झुंंबड
दापोली : कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका रास्त धान्य दुकानात येणाऱ्या ग्राहकाला बसू लागला आहे. शासनाने सर्व अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी ठेवली आहे. त्यामुळे रास्त दर धान्य दुकानेही या वेळेत सुरू राहत असल्याने गर्दी होत आहे.