कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने लांजात रोखल्या बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:22 PM2020-10-12T14:22:00+5:302020-10-12T14:23:49+5:30
state transport, Ratnagiri, ncp, lanja nagerpalika ठेकेदार पद्धतीने भरती करण्यात आलेल्या चालक - वाहक यांचा गेली चार महिने प्रशासनाने वेतन न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ वाजल्यापासून सुटणाऱ्या सर्व गाड्या रोखून धरण्यात आल्या होत्या.
लांजा : ठेकेदार पद्धतीने भरती करण्यात आलेल्या चालक - वाहक यांचा गेली चार महिने प्रशासनाने वेतन न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ वाजल्यापासून सुटणाऱ्या सर्व गाड्या रोखून धरण्यात आल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष यांनी लांजा आगारप्रमुखांना कर्मचारी यांचे वेतन देण्याबाबत पत्र दिले होते. तसेच वेतन रविवारीपर्यंत न देण्यात आल्यास सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजकेच कार्यकर्ते बसस्थानकातू सुटणाऱ्या एस्. टी. सकाळी १० वाजेपर्यंत रोखून धरल्याने त्यानंतर आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन मागे घेतले.
सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत एस्. टी. च्या बसफेऱ्या रोखून धरल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.