अंगणवाड्या करताहेत जास्त दराने धान्य खरेदी

By admin | Published: August 3, 2016 12:48 AM2016-08-03T00:48:15+5:302016-08-03T00:48:15+5:30

संगमेश्वर तालुका : धान्याचा पुरवठा न झाल्याचा फटका

Buy grain at high rates by performing anganwadi | अंगणवाड्या करताहेत जास्त दराने धान्य खरेदी

अंगणवाड्या करताहेत जास्त दराने धान्य खरेदी

Next

 फुणगूस : रास्तदर धान्य दुकानदारांच्या मागणीप्रमाणे पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा न झाल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांना धान्याची उपलब्धता होत नाही. यामुळे बालकांना पोषण आहार देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना बाजारातून जास्त दराने धान्य खरेदी करून आहार द्यावा लागतो. प्रशासनाच्या चुकीचा फटका अंगणवाडीसेविका व बचत गटांना सहन करावा लागतो.
जानेवारी ते जून या महिन्यांचे धान्य अंगणवाडीसेविका व बचत गटांना मिळालेले नाही. यामुळे अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रास्तदर धान्य दुकानांशी वारंवार संपर्क साधला असता काही अंगणवाड्यांचे धान्य प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये देवरूख परिसरातील अंगणवाड्यांचा समावेश आहे ज्यांना धान्यच मिळतच नाही.
याबाबत तालुका पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध न झाल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तालुक्यातील ७८ क्विंटल तांदळाची मागणी असताना केवळ ६० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. आलेल्या तांदळाप्रमाणे वाटप करताना अंगणवाड्यांचे धान्य राखून ठेवले आहे. फरकाच्या तांदळाची मागणी नवीन महिन्याच्या मागणीप्रमाणे केली आहे.
यानुसार धान्य आल्यास दोन दिवसातच अंगणवाड्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येईल. तोपर्यंत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार शिजवून देताना अंगणवाडीसेविका तसेच बचत गटांच्या महिलांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे.
त्यासाठी जादा रक्कम खर्च होत आहे. बालकांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी हा आहार शिजवण्यासाठी पदरमोड करावी लागते, तरी लवकरच धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
नाहक मनस्ताप : शासनातर्फे मोफत पोषण आहार योजना
४मागणीप्रमाणे पुरवठा विभागाकडून पुरवठा नाही.
४जानेवारी ते जून महिन्यांचे धान्य मिळालेलेच नाही.
४बालकांना पोषण आहार देण्यासाठी अनेक अडचणी.
४धान्याचा पुरवठा करण्याची मागणी.
राज्य शासनातर्फे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार दिला जातो. यासाठी अंगणवाड्यांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाड्यांना धान्य पुरवठाच न झाल्याने येथील अंगणवाडीसेविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 

Web Title: Buy grain at high rates by performing anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.