ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका
By Admin | Published: March 19, 2015 10:09 PM2015-03-19T22:09:24+5:302015-03-19T23:52:09+5:30
रणशिंग : २२६ रिक्त जागांकडे लक्ष
रत्नागिरी : मे ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील रिक्त होणाऱ्या ९० ग्रामपंचायतींच्या २२६ रिक्त जागांसाठी १२३ प्रभागांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.जिल्ह्यात एकूण ८४७ ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ४७२ ग्रामपंचायतीच्या मुदती संपत असल्याने त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी २२० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. यांपैकी आता ९० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निश्चित झाल्या आहेत.या ग्रामपंचायतीत विविध प्रवर्गातील काही जागा मे ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत रिक्त होणार आहेत. त्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या ९० ग्रामपंचायतीच्या एकूण १२३ प्रभागातील एकूण २२६ सदस्यांसाठी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आता लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होणार असल्याने रिक्त झालेल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी आता सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या जागांसाठी उमेदवार उभे करणे सर्वच पक्षांकडून प्रतिष्ठेचे केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात या ग्रामपंचायत पोटनिवडणुका चांगल्याच गाजणार आहेत. (प्रतिनिधी)
मे ते आॅगस्टमध्ये निवडणुका
मंडणगड(०४/ ७)घराडी, पडवे, मुरादपूर, तोंडली.
दापोली(०९/१३)सोंडेघर, बांधतिवरे, कांगवई, भोमडी, वेळवी, भडवळे, डवली, मांदिवली, फणसू.
खेड(१०/१६)सुसेरी, वडगाव, रजवेल, चौगुले मोहल्ला, सवणसखुर्द, अलसुरे, खोपी, सवणस, आस्तान, दिवाणखवटी.
चिपळूण(१५/२१)दोणवली, डेरवण, ढाकमोली, गोंधळे, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द, केतकी, नारदखेरकी, पोफळी, देवखेरकी, डुगवे, खांडोत्री, गाने, निर्व्हाळ, रावळगाव.
गुहागर(०७/११)आंबेरे खुर्द, पाली, पाचेरी आगार, वरवेली, वेलदूर, झोंबडी, मढाळ.
संगमेश्वर(१८/२६)शेंबवणे, कुंडी, तांबेडी, पोचरी, मुचरी, कासे, कुळे, राजिवली, माखजन, असुर्डे, गुरववाडी, शिरंबे, पाटगाव, पुर्ये तर्फ सावर्डा, सरंद, फणसट, किरडुवे, मावळंगे, कळंबुशी.
रत्नागिरी(०३/५)बोंड्ये, पुर्णगड, कुवारबाव. $$््िलांजा(१३/१९)झापडे, कुर्णे, बेनीबुद्रुक, शिरवली, कोंडगे, कोंड्ये, कुरचुंब, खानवली, सालपे, कोर्ले, कोलधे, रिंगणे, वाघ्रट.
राजापूूर(११/१७)कोळवणखडी, कोतापूर, देवाचे गोठणे, कोंड्ये तर्फ सांैदळ, आंगले, खरवते, परूळे, मोगरे, वडदहसोळ, साखरीनाटे, वडवली.