प्रवाशांसाठी ‘कॅटकार्ड’ ठरतेय ‘बचत कार्ड

By admin | Published: August 24, 2016 10:35 PM2016-08-24T22:35:18+5:302016-08-24T23:45:08+5:30

रत्नागिरी विभाग : एस. टी.च्या योजनेला वाढता प्रतिसाद

'Cadard' for passengers is 'savings card' | प्रवाशांसाठी ‘कॅटकार्ड’ ठरतेय ‘बचत कार्ड

प्रवाशांसाठी ‘कॅटकार्ड’ ठरतेय ‘बचत कार्ड

Next

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. प्रवाशांसाठी अठरा किलोमीटरच्या पुढे प्रवास करणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत कॅट कार्ड देण्यात येते. कॅटकार्डधारक प्रवाशाला दीड लाखाची विमा सवलत देण्यात येते. गेल्या नऊ वर्षामध्ये रत्नागिरी विभागातील २२ हजार ३२७ प्रवाशांनी याचा लाभ घेतला, त्यामुळे विभागास ४ कोटी ४५ लाख ४ हजार रूपयांचा लाभ मिळाला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २००३ साली कॅटकार्ड सुविधा सुरू केली. मात्र, त्यावेळी फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. परंतु सन २००८नंतर कॅटकार्ड खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला तरी गेल्या दोन वर्षात वापरामध्ये पुन्हा घसरण झाली
आहे.
एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक पास सवलतीच्या दरात वितरीत करण्यात येतो. महाराष्ट्रभर फिरण्यासाठी आवडेल तेथे प्रवास योजना सुरू आहे. चार ते सात दिवसांच्या प्रवास योजनेसाठीही प्रवाशांचा लाभ मिळत आहे.
२००३पासून महामंडळाने कॅटकार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला १८ किलोमीटरच्या प्रवासापुढे दहा टक्के सवलत देण्यात येते. शिवाय प्रवाशाला दीड लाखाचे विमा संरक्षणही देण्यात येते. कॅटकार्ड २०० रूपये भरून प्रवाशाला वितरीत करण्यात येत आहे.
कॅटकार्डधारक प्रवाशाच्या एस. टी.ला अपघात झाल्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तीन लाखाचे अर्थसहाय्य तसेच दीड लाख विमा परतावा मिळत असल्याने कॅटकार्डसाठी ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. गेल्या नऊ वर्षामध्ये रत्नागिरी विभागातील २२ हजार ३२७ प्रवाशांनी याचा लाभ घेतला होता. त्याद्वारे विभागाला ४ कोटी ४५ लाख ४ हजार रूपयांचे उत्पन्न लाभले.
लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कॅटकार्ड फायदेशीर ठरत आहे. अठरा किलोमीटरच्या पुढील प्रवासाला दहा टक्के सवलत मिळत असल्याने तिकीट खर्चात बचत होते. शिवाय दीड लाखाचा प्रवासी संरक्षित विमा असल्याने त्याचाही लाभ होतो. परंतु गेल्या दोन वर्षात कॅटकार्डचा वापर पुन्हा कमी झाला आहे. (प्रतिनिधी)


सन २००८मध्ये १३९४ कॅटकार्डची विक्री झाली. २००९ मध्ये १४२६, २०१०मध्ये १५९४, २०११मध्ये २०२५, २०१२मध्ये २७६४, २०१३मध्ये २८७८, २०१४मध्ये ३६८७, २०१५मध्ये ११४१, तर एप्रिल ते जुलै २०१६ अखेर ११८६ प्रवाशांनी कॅटकार्ड विकत घेतली.

Web Title: 'Cadard' for passengers is 'savings card'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.