चिपळुणात मोकाट जनावरांविरोधात मोहीम, गाई, म्हशींसह गाढव ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:15 PM2020-12-25T17:15:10+5:302020-12-25T17:16:33+5:30
Muncipal Corporation Chiplun Ratnagiri- गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित झालेल्या मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे नगरपरिषदेने पुन्हा एकदा लक्ष घातले आहे. बुधवारपासून याबाबत व्यापक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये काही गाई, म्हशींसह गाढवांना ताब्यात घेतले आहे. संबंधित मालकांवर कारवाई केली जाणार आहे.
चिपळूण : गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित झालेल्या मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे नगरपरिषदेने पुन्हा एकदा लक्ष घातले आहे. बुधवारपासून याबाबत व्यापक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये काही गाई, म्हशींसह गाढवांना ताब्यात घेतले आहे. संबंधित मालकांवर कारवाई केली जाणार आहे.
सध्या बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्यांवर मोकाटपणे जनावरे फिरत असल्याने त्यातून अपघाताचे प्रकारही वाढले आहेत. त्यातच बाजारपेठेतून भरधाव वेगाने धावत जाणाऱ्या गाढवांमुळे काही पादचारी जखमी झाल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे याविषयी ओरड सुरू असून संबंधित जनावरांच्या मालकांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, नगर परिषदेचा कोंडवाडा उपलब्ध नसल्याने पकडलेल्या जनावरांची व्यवस्था कुठे करावी, असा प्रश्न नगर परिषदसमोर होता.
आता तात्पुरती खेडेकर क्रीडा संकुलाच्या पार्किंग जागेत काही जनावरांची व्यवस्था केली आहे. नगरपरिषदेकडून ही कारवाई यापुढे सातत्यपूर्ण सुरू ठेवली जाणार आहे तसेच संबंधित जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले. ही मोहीम आणखी काही दिवस राबवली जाणार आहे.