निवडणूक प्रचारामध्ये मुंबईकरांची गाडी सुसाट--: पदाधिकारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:02 AM2019-04-20T11:02:25+5:302019-04-20T11:07:40+5:30
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली
मनोज मुळ्ये ।
रत्नागिरी : नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली असून, ग्रामीण भागात मुंबईकरांच्या प्रचाराने अधिक वेग घेतला आहे.
कोकणातील विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जवळजवळ प्रत्येक घरातील एक व्यक्ती तरी मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी स्थलांतरीत झाली आहे. परक्या गावात गेल्यानंतर तेथे असलेले आपल्या गावातील लोक शोधण्याची सहज प्रवृत्ती असते. त्यातूनच मुंबईत असंख्य ग्रामविकास मंडळे आहेत. ही मंडळे आपापल्या गावातील समस्या मंत्रालय स्तरावरून मार्गी लावतात. गावाच्या ध्येयधोरणांचे निर्णयही अनेकदा या ग्रामविकास मंडळांकडून घेतले जातात आणि ते गावात मान्यही केले जातात. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे.
मुंबईतील मतदान २९ रोजी असल्यामुळे रत्नागिरीतील मतदान आटोपल्यानंतर हे सर्व मुंबईत जाऊन प्रचार करतील, असे नियोजन आहे.
शिवसेनेचा संपर्क अधिक
मुंबईत असलेली कोकणी मंडळे, कोकणी लोकप्रतिनिधी यात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यात शिवसेना उमेदवार विनायक राऊत हे पक्षाचे सचिव असल्याने त्यांचा या मंडळांशी चांगला संपर्क आहे. मुंबईतील कामगारांशी संपर्क चांगला आहे आणि शिवसेनेचे मुंबईतील बहुतांश लोकप्रतिनिधी कोकणातील आहेत. त्यामुळे मुंबईकर शिवसेनेच्या अधिक फायद्याचे आहेत.
शिवसेनेचा संपर्क अधिक
मुंबईत असलेली कोकणी मंडळे, कोकणी लोकप्रतिनिधी यात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यात शिवसेना उमेदवार विनायक राऊत हे पक्षाचे सचिव असल्याने त्यांचा या मंडळांशी चांगला संपर्क आहे. मुंबईतील कामगारांशी संपर्क चांगला आहे आणि शिवसेनेचे मुंबईतील बहुतांश लोकप्रतिनिधी कोकणातील आहेत. त्यामुळे मुंबईकर शिवसेनेच्या अधिक फायद्याचे आहेत.
राणे यांचाही संपर्क
स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांचाही मुंबईतील कोकणी मंडळांशी चांगला संपर्क आहे. विविध खात्यांच्या मंत्री पदामुळे गावागावातील कामाच्या निमित्ताने ते या मंडळांशी जोडले गेले आहेत. नितेश राणे यांची मुंबईत समर्थ कामगार संघटना आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपल्याकडे खेचण्यात शिवसेनेप्रमाणे स्वाभिमान पक्षही आग्रही आहे.
मुंबईस्थित मंडळे हा कोकणासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि अशा मंडळांचे महत्त्व राजकीय लोकांनाही चांगले माहिती आहे. त्यामुळेच अशा मंडळांशी राजकीय पक्षांकडून सातत्याने संपर्क ठेवला जातो. सध्याची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच अशा मंडळांच्या मुंबईमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. मंडळांच्या प्रमुख पदाधिकाºयांची गावातील लोकांशी चर्चा झाली आहे.
मुंबईत असलेल्या मंडळांमध्ये बहुतांश मध्यमवर्गीय मंडळींचा समावेश आहे. त्याखेरीज कामगारवर्गातही कोकणी माणसांची संख्या खूप मोठी आहे. बहुतांश कामगार संघटना शिवसेनेकडे आहेत. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून या वर्गामध्ये शिवसेना पोहोचली आहे. त्यातच विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव असल्याने, कामगार संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. कोकणातील हे कामगारही या निवडणुकीत सहभागी होतात.
सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे तो लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईत काम करणाºयांचा. पक्षीय पदे किंवा नगरसेवक ते आमदार अशा विविध पदांवर अनेक कोकणी लोक काम करत आहेत. कामधंद्यासाठी मुंबईत गेलेल्या कोकणी लोकांनी शिवसेनेला खूप मोलाची साथ केली. त्यातून शिवसेना मोठी झाली. शिवसेना मोठी होतानाच असंख्य कोकणी लोकंही मोठी झाली.
शिवसेनेच्या पहिल्या फळीतही कोकणी लोकांची संख्या खूप मोठी होती. त्यातून अनेक कोकण लोक मुंबईतील राजकारणात शिरले आणि विविध पदांवर विराजमान झाले. मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवक मूळचे कोकणातील आहेत. ज्यावेळी कोणत्याही निवडणुका येतात, तेव्हा ही सर्व मंडळी प्रचारासाठी कोकणात आपापल्या गावी येतात. मुंबईकरांच्या शब्दाला गावागावात मान असल्याने त्यांच्या प्रचाराला राजकीय पातळीवरही महत्त्व दिले जात आहे.