कार कोसळून मेढेत अपघात, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:18 AM2019-02-28T11:18:58+5:302019-02-28T11:20:39+5:30
महाबळेश्वरनजीकच्या मेढा घाटात स्वीफ्ट डिझायर कार दरीत कोसळून अपघात झाला. अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
दापोली : महाबळेश्वरनजीकच्या मेढा घाटात स्वीफ्ट डिझायर कार दरीत कोसळून अपघात झाला. अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
दापोलीतील कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, ओम शिवभक्त मंडळ अध्यक्ष बालू भलगट, मनसे शहराध्यक्ष राकेश माळी, महावीर एम्पोरिअमचे मालक मनोहर जैन, त्यांच्या पत्नी मीना जैन, नातू युवराज (१.५ वर्ष) व गणेश चरचरे असे ६ जण स्वीफ्ट डिझायर कारने सातारा ते महाबळेश्वर असा प्रवास करत होते.
दरम्यान मेढा घाटात सुमारे ३०० फूट खोल दरीत कार कोसळून अपघात झाला. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने या सर्व जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्वांना यशवंत हॉस्पिटल, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.