रत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:10 PM2018-06-25T18:10:57+5:302018-06-25T18:12:58+5:30
इनोव्हा गाडीचे मालक गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून एटीएममध्ये पैसै काढायला गेले. त्याचवेळी विनाचालक इनोव्हा गाडी रिव्हर्स जाऊन पेट्रोल पंपात घुसली. तेथील दोन वाहनांना जोरदार धडक देऊन स्टेट बॅँकेच्या एटीएमसमोर थांबली. शहरातील जुना माळनाका येथे गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.
रत्नागिरी : इनोव्हा गाडीचे मालक गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून एटीएममध्ये पैसै काढायला गेले. त्याचवेळी विनाचालक इनोव्हा गाडी रिव्हर्स जाऊन पेट्रोल पंपात घुसली. तेथील दोन वाहनांना जोरदार धडक देऊन स्टेट बॅँकेच्या एटीएमसमोर थांबली. शहरातील जुना माळनाका येथे गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा माळनाका येथील एका हॉटेलच्या बाजूला थांबली. गाडीमालक येथील एका एटीएमध्ये गेला. त्याच दरम्यान उभी असलेली ही इनोव्हा गाडी आपोआप मागच्या बाजूला जाऊ लागली.
या दरम्यान इनोव्हा जवळच असलेल्या पेट्रोल पंपात घुसताना दोन वाहनांवर जोरात धडकली. त्यामध्ये एका नव्या कोऱ्या रिक्षाचाही समावेश आहे. या विचित्र अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून, वाहनांना धडक दिल्यानंतर ही इनोव्हा थेट पेट्रोल पंपामधील एटीएमच्यासमोर विसावली.