पाचल - कोंडवाडी येथे ७५ जणांची काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:09+5:302021-07-23T04:20:09+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पाचल कोंड गोरुळेवाडी येथे ॲंटिजन व आरटीपीसीआर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात ...
पाचल : राजापूर तालुक्यातील करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पाचल कोंड गोरुळेवाडी येथे ॲंटिजन व आरटीपीसीआर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. या शिबिरात सुमारे ७५ ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली.
पाचल आणि पाचल परिसरात माेठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक नागरिकांची कोरोना तपासणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याचाच एक भाग म्हणून करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ ग्रामस्थांची कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
यावेळी पाचलचे आरोग्यसेवक एस. एस. झोरे, अनिता बामणे, मिथिला मोहिरे, अंगणवाडी कर्मचारी सुहासिनी कामेरकर, सुचिता चव्हाण उपस्थित होते. या शिबिरासाठी तेजस गोरुले, ग्रामस्थ शांताराम चव्हाण, शांताराम शिंदे, बापू गोरुले, विनोद गोरुले, मंगेश गोरुले, अक्षय शिंदे, विनोद गोरुले, रामचंद्र चव्हण, लक्ष्मण दिंडे, गजानन गोरूले, गणेश गोरुले यांनी सहकार्य केले.