रत्नागिरीतील ‘गांजा’चे कर्नाटक कनेक्शन उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:17 PM2018-10-14T23:17:25+5:302018-10-14T23:17:29+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून गांजा व तत्सम नशिल्या पदार्थांची विक्री खुलेआम केली जात होती. मात्र, ...

Carnatic connection of 'Ganja' in Ratnagiri is open | रत्नागिरीतील ‘गांजा’चे कर्नाटक कनेक्शन उघड

रत्नागिरीतील ‘गांजा’चे कर्नाटक कनेक्शन उघड

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून गांजा व तत्सम नशिल्या पदार्थांची विक्री खुलेआम केली जात होती. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे त्याबाबतचे बिंग फुटले आहे. कुवारबाव रेल्वे फाट्यावर जप्त करण्यात आलेला गांजा हा थेट कर्नाटकमधून आल्याचे स्पष्ट झाले असून, रत्नागिरीतील गांजाचे कर्नाटकी कनेक्शन यामुळे अधोरेखित झाले आहे. आता या कनेक्शनची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांकडून जोरदार तपास सुरू झाला आहे.
याआधी गेल्याच आठवड्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर राहुल कॉलनीजवळ पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी एका घरात तसेच तेथे खरेदी करण्यास आलेल्या ३ ग्राहकांकडे मिळून २ किलो ९२ ग्रॅम वजनाचा गांजा व अन्य साहित्य असा ४६,२८६ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
याप्रकरणी नूरजहॉँ आसिफ मिरजकर, नजफ आसिफ मिरजकर, गांजा खरेदीकरिता आलेले जुबेर हुसेन शेखावत (३८, साळवी स्टॉपजवळ, रत्नागिरी), रेहान रियाज काळसेकर (२३, माहेगीर मोहल्ला, मजगाव), सर्फराज अहमद शहा (२९, गवळीवाडा, रत्नागिरी) अशा ५ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून सुरू असलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आपल्या पुढील तपासाला जातीनिशी वेग दिला.
शनिवारी रात्री रत्नागिरी शहरात स्कूटरने गांजा घेऊन येणाऱ्या शिवलिंगप्पा पुजारी (मूळ कर्नाटक, सध्या साळवी स्टॉप झोपडपट्टी) याला कुवारबाव रेल्वे स्टेशन फाटा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले होते. त्याच्याकडे २ किलो गांजा आढळून आला होता.
स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
गेल्या आठवड्यात रत्नागिरीत करण्यात आलेल्या कारवाईत गांजा कोल्हापूरमार्र्गे येत असल्याचे उघडकीस आले होते. मात्र, आता पुजारी याच्या अटकेनंतर त्याच्या केलेल्या चौकशीत पुजारी याचा संपर्क हा रत्नागिरीतील गांजा विक्रेत्यांबरोबरच कर्नाटकातून गांजा पुरवठा करणाºया रॅकेटपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांना कर्नाटकमधील गांजा विक्री करणाºया रॅकेटपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. रत्नागिरीनजीक हातखंबा येथून भरधाव वेगाने कुवारबाव येथे येताना पुजारीला पकडण्यात आले
होते.
त्याच्या दुचाकीच्या डिकीमध्ये गांजा सापडला होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. याप्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
अधीक्षकांची भूमिका महत्त्वाची
गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीत गांजा विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. याबाबत गवगवा होऊनही त्यावेळी कारवाई झाली नव्हती. गांजा विक्रीचा व्यवसाय शहर पोलीस स्थानकापासून काही मीटर अंतरावर असूनही त्यावर इतक्या वर्षांनंतर कारवाई होत आहे. ही बाबही लक्षणीय मानली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गांजा विक्री करणाºयांवर कारवाईसाठी पुढाकार घेतल्यानेच या टोळीचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांचे नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.

Web Title: Carnatic connection of 'Ganja' in Ratnagiri is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.